आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला मोठा झटका दिलाय. कारण जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करायला कोर्टानं नकार दिलाय. निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. यावरुन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
न्यायालयात गेलेल्या प्रत्येक प्रकरणात नाचक्की होऊनही ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता चालढकल करणाऱ्या ठाकरे सरकारचा हेतू आता स्पष्ट झाला आहे. ओबीसींच्या आरक्षणाची पुनर्स्थापना करण्याकरिता इंपिरिकल डाटा तयार करणे हाच एकमेव उपाय असतानाही त्याकरिता चालढकल करून आरक्षण कायमचे गोठविण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे, असा आरोप माधव भंडारी यांनी यावेळी केला.
हे ही वाचा : ‘बैलगाडा शर्यतीचं श्रेय कोणाचं?’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा, म्हणाले…
ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची सरकारमधील तीनही पक्षांची इच्छाशक्तीच नसल्याने या प्रकरणात न्यायालयाची चपराक खाल्ल्यानंतरही पुन्हा कोलांटउड्या मारत जबाबदारी ढकलण्याचे खेळ सरकारने सुरू केले आहेत, असं माधव भांडारी यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारने 31 जुलै 2019 रोजी काढलेला अध्यादेश कायद्यात परिवर्तित करण्यात जाणीवपूर्वक चालढकल केल्याने तो अध्यादेश रद्दबातल झाला तेव्हाच ठाकरे सरकारचा हेतू स्पष्ट झाला होता. त्यानंतर ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा न्याय्य कसा, हे स्पष्ट करण्याच्या न्यायालयाच्या आदेशावर कार्यवाही करण्यात ठाकरे सरकारने तब्बल 15 महिने चालढकल केली, आणि आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पलीकडे जात असल्याचं सांगून ते पुनर्स्थापित करण्याचे मार्ग स्वतःच बंद केले, असं माधव भांडारी म्हणाले आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारकडे वारंवार बोटे दाखवून अपयश लपविण्याच्या पळपुट्या वृत्तीची इथेही राज्य सरकारने पुनरावृत्ती केली आणि केंद्र सरकार इंपिरिकल डाटा देत नसल्याचा कांगावा सुरू केला. आता सर्वोच्च न्यायालयानेच राज्य सरकारचे कान उपटले असल्याने इंपिरिकल डाटा तयार करणे ही राज्य सरकारचीच जबाबदारी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतरही राज्य सरकार पळपुटेपणा करत असल्याने, आता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून जाब विचारण्याची वेळ आली आहे, असंही माधव भंडारी यांनी यावेळी म्हटलं आहे
महत्वाच्या घडामोडी –
रोहित पाटलांच्या ’25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही’च्या भाषेवर अजित पवार म्हणाले…
“पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याच्या घरी घेतला जेवणाचा आस्वाद”
“राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकानं पुन्हा हाती बांधलं घड्याळ”