आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व चिरंजीव रोहित पाटील हे राजकारणात सक्रीय झाले आहेत. तसेच सध्या सांगली जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणूकीचं वारं वाहू लागलं आहे. अशातच त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आल्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार झाली आहे. यावेळी बोलताना माझं वय 23 आहे. 25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही, असं रोहित पाटील यांनी म्हटलं होतं.
रोहित पाटलांनी केलेल्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या त्या जिल्ह्याचं राजकारण पाहून निर्णय घ्यायचा आहे. प्रांत अध्यक्ष हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मीही रोहितला फोन करून विचारेन. रोहित गेल्याच आठवड्यात मला भेटला होता. पण असं कोण कुणाला एकटं पाडेल असं वाटत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याच्या घरी घेतला जेवणाचा आस्वाद”
रोहितची कामाची पद्धत चांगली आहे. मी त्या संदर्भात माहिती घेऊन त्याला काय मदत पाहिजे ती देण्याचं काम करेन, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, येणाऱ्या काळात असा भीमटोला देण्याची आवश्यकता आहे. माने सर, आपण सांगितलं की 25 वर्षांच्या तरुणाला हरवायला सगळे जण एकत्र आले आहेत. माझं वय 23 आहे. 25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही, असं रोहित पाटील म्हणाले होते.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकानं पुन्हा हाती बांधलं घड्याळ”
मनसेला आणखी एक धक्का?; ‘या’ मोठ्या नेत्याची शिवसेना नेत्यासोबक गुप्त बैठक; चर्चांना उधाण
राजसाहेब मी महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन, पण…; सुहास दाशरथे यांनी बोलून दाखवली अस्वस्थता