आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. रूपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, असा सवाल उपस्थित झाला होता. मात्र आता रूपाली पाटील या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, असं स्पष्ट झालं आहे.
हे ही वाचा : OBC reservation: केंद्र सरकारने राज्य सरकारची अडवणूक केली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
रूपाली पाटील या आता राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत, हे आता स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित रूपाली पाटील यांचा उद्या मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवली”
रूपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्यावर मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
OBC reservation: सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला मोठा झटका; ओबीसी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका