आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर रूपाली पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली महत्त्वपूर्ण बैठक, घेतला ‘हा’ मोठा निर्णय”
मनसेचा नेमका कोणत्या कारणांमुळे राजीनामा दिला, या प्रश्नाविषयी प्रश्न विचारला असता, मनसेत निःस्वार्थी, प्रचंड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. मी या परिवारात बहीण म्हणून नेहमी त्यांच्यासोबत असेन. पण माझी खदखद मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवेन. पण मला न्याय देत असताना, लोकांना उत्तर देत असताना खंबीरपणे साथीची गरज असते. तिच मिळत नसेल तर तक्रार करणे अवघड होते. याविषयीच्या भावना राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. आता मला माझ्या गोष्टी परत परत सगळ्यांसमोर बोलून दाखवायच्या नाहीत., असं रूपाली पाटील म्हणाल्या.
दरम्यान, राज ठाकरे हे माझे दैवत आहेत, होते आणि राहतील. मी संघर्ष करणारी आणि सर्वसामान्यांवर प्रेम करणारी सर्वसामान्य कार्यकर्ती आहे. मनसेमध्ये मी राज ठाकरेंकडे बघून राजकारणात आले., असं रूपाली पाटील म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
OBC reservation: केंद्र सरकारने राज्य सरकारची अडवणूक केली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
“आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवली