आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं चांगलीच कंबर कसली असून याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे दौरे आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. सध्या मुंबई, पुणे आणि नाशिककडे मनसेने जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. तर राज ठाकरे औरंगाबादचा दौराही करणार आहेत.
सर्वात पहिली राज ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत. त्यासाठी ते नाशिकला रवाना झाले आहेत. उद्या सकाळी 10 वाजता नाशिक मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश होणार आहे.
हे ही वाचा : कृषिमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी…; शरद पवारांनी दिला अठवणींना उजाळा
दरम्यान, नाशिकच्या दौऱ्यानंतर ते औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. मंगळवारी राज ठाकरे औरंगाबादेत सकाळी 10 वाजता मराठवाड्यातील पदाधिकारी यांच्यासौबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता सागर लॉन येथे दिलीप चितलांगे यांच्या वर्तमान पत्राचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“मनसेचा डबल धमाका; शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
“…तर 48 खासदार असलेला शिवरायांचा मावळा पंतप्रधान का होऊ शकत नाही?”