आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : राष्ट्रवादीसाठी सर्व पर्याय खुले आहेत. भाजपही दूर नाही, असं विधान करून खळबळ उडवून दिल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता सारवासारव केली आहे.
कुणी काही म्हणू द्या 99 टक्के आपली आघाडी होणारच. भाजपला पराभूत करण्यासाठी हवं तर दोन पावलं मागे येऊ, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ अभियानांतर्गत कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा : लोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर अखेर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर बोंबाबोंब सुरु आहे. मात्र, आपण ठामपणे सांगत आहोत की, 99 टक्के आघाडी होणारच आहे. काहीजण असे आहेत की दुधात मिठाचा खडा टाकून आघाडी करु नका, असे सांगत आहेत. मात्र, त्यांना मी सांगू इच्छितो की, आपला खरा वैचारिक शत्रू हा भाजप आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आपणाला दोन पावले मागे यावे लागले तरी हरकत नाही, असं आव्हाड म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
जितेंद्र आव्हाड म्हणतात, राष्ट्रवादीसाठी सर्व मार्ग खुले; विनायक राऊत म्हणाले…
“पुण्यातील भाजपच्या दोन नेत्यांनी वक्फच्या जमिनी हडपल्या, लवकरच त्यांना अटक होणार”
सांगलीत शिवसैनिकांनी रूग्णांना मिळवून दिला न्याय, हाॅस्पिटलने फसवणूक केलेली रक्कम दिली परत