आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे, अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर केली होती. या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.
राज्यात महाविकास आघाडी सरकारनं अराजक माजवलं आहे. राज्यात 11 महिन्यात 2 हजार 270 शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. मराठा आणि ओबीसी समाजातही निराशा पसरली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
हे ही वाचा : मीही इंग्रजीत प्रश्न विचारला असता पण…; विनायक राऊतांनी नारायण राणेंना डिवचलं
आरोग्य विभाग तसंच एमपीएससी विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात घालवलं. जाऊ तिथं खाऊ हेच या सरकारचं धोरण आहे. आपल्या डोळ्यातील मुसळ झाकून दुसऱ्याच्या डोळ्यात कुसळ पेरु नका. अन्यथा राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारला उलथवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान, भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. हे पवारांनी 1996मध्ये सांगितलं होतं. ते आता आम्हाला कळू लागलं आहे. हे पुस्तक आपण मोदींना पाठवायला हवं. महाराष्ट्र हा देशाला विचार देत असतो. ‘नेमकची बोलणे’ हे पुस्तक पंतप्रधान मोदींना पाठवायला हवं, असं संजय राऊत यांनी सामना मध्ये म्हटलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
गेली 25 वर्षे त्यांची महापालिकेवर सत्ता आहे, पण…; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल
“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकरी”