आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. मनसेनंही आगामी महापालिका निवडणूकासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अशातच आता मनसेनं सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतला असून आज मनसेतर्फे 40 समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या कार्यक्रमात मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वत: सहभाग घेतला. या कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली.
हे ही वाचा : शरद पवारांनी 25 वर्षांपूर्वी जे सांगितलं, आम्हांला ते 2 वर्षांपूर्वी समजलं; संजय राऊतांचा भाजपला टोला
स्वच्छता मोहिमेसाठी इच्छाशक्ती लागते. गेली 25 वर्ष त्यांच्याकडे महानगरपालिकेची सत्ता आहे, सरकार आहे. पण त्यांच्याकडे दुर्दैवाने इच्छाशक्ती नाही. त्यामुळे या गोष्टी झालेल्या नाहीत, अशी टीका अमित ठाकरेंनी यावेळी शिवसेनेवर केली.
समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाच्या बाबतीत कसं काम होणार? हा आपला समुद्र किनारा आहे. हा आपण साफ ठेवायला हवा. कारण सरकारकडून अपेक्षा ठेऊन चालणार नाही. त्यांच्यावर जबाबदारी ठेवून पाहिलंय काय होतंय ते?, असा टोलाही अमित ठाकरेंनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकरी”
…तर भाजप आम्हांला दूर नाही; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा
“कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार पडणार?; ‘हा’ माजी आमदार भाजपच्या वाटेवर?”