आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागातील कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यामुळे भोईर हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. सुभाष भोईर भाजपमध्ये गेल्यास ते भाजपचे लोकसभेचे उमेदवार असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मला पक्षाच्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. त्यामुळे मी जात नाही. बोलावलं तर जाईल, अशी खंत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केली आहे. तसेच मी कुठे जात नाही. पण माझा निर्णय घेण्यास मी सक्षम आहे, असं सूचक विधानही सुभाष भोईर यांनी केलं आहे.
हे ही वाचा : इचलकरंजी नगरपालिका भाजपमुक्त करायची- सतेज पाटील
2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेकडून सुभाष भोईर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ही उमेदवारी नंतर रद्द करण्यात आली. त्यानंतर आज भोईर यांनी भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागातील कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
दरम्यान याविषयी त्यांना विचारलं असता अशी कुठली चर्चा नसल्याचे सांगून त्यांनी काही सूचक विधानेही केली आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेने निवडणुकीसाठी युती एकाशी आणि सत्तेसाठी सोयरिक तुमच्याशी केली, हे तुम्ही बरं खपवून घेतलंत”
जनतेनंही ठरवलंय, 2024 मध्ये बदल हवाच, उघड दार देवा आता उघड दार…
राजकारण करायचंय, तर समोरून करा, कुटूंबावर हल्ला कशाला; सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या