आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : शिवसेनेनं आज मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यानंतर सुभाष देसाई यांनी मनसेवर निशाणा साधला.
हे ही वाचा : पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन
मनसेही गळकं घर असल्याने मनसेचे पदाधिकारी स्वगृही परतत आहेत. कारण शिवसेनेचा वाडा गळका नाही. येथे प्रवेश मिळतो पण बाहेर जाण्यासाठी कुणी दरवाजा उघडत नाही., असा टोला सुभाष देसाई यांनी मनसेला लगावला.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील विकास कामांमुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचं पर्व सुरू झालं असल्याचं सुभाष देसाई म्हणाले. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. सिडकोतील रहिवाशांना त्यांच्या घराचा हक्क देण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचं पालक मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेचा मनसेला दणका; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत केला शिवसेनेत प्रवेश”
“आघाडीचा निर्णय व्हायचा तो होईल, सध्या तरी स्वबळावर लढायचंय गृहीत धरून तयारीला लागा”
“बीडमध्ये मनसेचा विजयी झेंडा; नांदूरघाट जिल्हा परिषद गटात मनसेचा उमेदवार बिनविरोध”