आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री किशोरी पेडणेकर यांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जात जबाब नोंदवला. त्यानंतर शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.
हे ही वाचा : केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला- राज ठाकरे
वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली होती. महापौरांना या घटनेची माहिती नव्हती का? 72 तासांनंतर महापौर रुग्णांच्या चौकशीसाठी पोहोचतात, 72 तास कुठे निजला होता? अशा शब्दात शेलार यांनी पेडणेकरांवर टीका केली होती.
दरम्यान, शेलारांच्या कुठे निजला होता? याच वक्तव्यावर आक्षेप घेत महापाैर किशोरी पेडणेकरांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहीत तक्रार केली आहे. तसेच त्यांनी पोलिसांत तक्रार करत असल्याचंही म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री किरीट सोमय्यांच्या रडारवर; ट्विट करत दिली माहिती”
“खासदार संजय राऊत यांनी घेतली काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची भेट, तर्कवितर्कांना उधाण”
गरम असलेल्या शशिकांत शिंदेंना थंड करुन घरी बसवणार; शिवेंद्रराजे भडकले