मुंबई : लॉकडाउन काळात वाधवान कुटुंबियांना प्रवासाची परवानगी कशी मिळाली यावरुन राज्यात बराच गदारोळ माजला होता. यावर तात्काळ पावलं उचलत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनचा नियम मोडणाऱ्या आरोग्य मंत्र्यांचं तिकडच्या राष्ट्राध्यक्षांनी पद काढून घेतलं. उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत आहोत, मात्र आपण अमिताभ गुप्ता यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत दिले असते तर तुमचा कणखरपणा दिसला असता, असं म्हणत राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
दरम्यान, वाधवान प्रकरणात गुप्ता यांनी दिलेल्या पत्राची चौकशी करण्यासाठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी ते चौकशी करून पंधरा दिवसांमध्ये आपला अहवाल सरकारला सादर करणार आहेत.
न्यूझीलंड च्या राष्ट्राध्यक्षांनी लॉक डाऊन चा नियम मोडल्याबद्दल आपल्या आरोग्य मंत्र्यांचा माफीनामा फेटाळून त्यांना पदावनती लादली !उद्धवजी आम्ही तुमच्याबरोबर आहोतच पण गृह सचिव अमिताभ गुप्ता यांचेवर कठोर कारवाई चे संकेत दिले असते तर तुमचा कणखरपणा दिसला असता @ANI, @CMOMaharashtra
— Raju Shetti (@rajushetti) April 12, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…तर सरकारला प्रश्न जरूर विचारणार; निलेश राणेंच मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र
“चंद्रकांतदादा, सगळा देश सध्या कोरोना विरोधात लढाई लढतोय… अन् तुम्हाला राजकारण सुचतंय”
“सांगलीत गणेश दर्शन घेण्यासाठी आलेल्या 53भक्तांना नोटिस”
तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो; मुख्यमंत्र्यांच जनतेला आवाहन