आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
चेन्नई : काल तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात भारताचे सीडीएस बिपिन रावत व त्यांच्या पत्नीही होत्या. भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 12 जण शहीद झाल्याचे माहिती दिली आहे. यावरून संपूर्ण देशानं शोक व्यक्त करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करत यासंदर्भात शोक व्यक्त करत शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हे ही वाचा : “ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री किरीट सोमय्यांच्या रडारवर; ट्विट करत दिली माहिती”
आपल्या देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल बिपीनजी रावत यांना एका अत्यंत दुर्दैवी अपघातात आपण गमावले आहे. तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांच्या पत्नी आणि अन्य लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे. लष्कराच्या माध्यमातून या सर्वांनी केलेली देशसेवा आपण कधीही विसरू शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अपघातातील मृत्यूमुखींना भावपूर्ण श्रद्धांजली.’, असं ट्विट करत राज ठाकरेंनी शहीद झालेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
#RIPBipinRawat #बिपीन_रावत_श्रद्धांजली pic.twitter.com/PT8enliLXm
— Raj Thackeray (@RajThackeray) December 8, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“खासदार संजय राऊत यांनी घेतली काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची भेट, तर्कवितर्कांना उधाण”
गरम असलेल्या शशिकांत शिंदेंना थंड करुन घरी बसवणार; शिवेंद्रराजे भडकले
शिवसेनेकडून भाजपला मोठा धक्का; वर्ध्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश