मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. सध्याची ही वेळ राजकारण करण्याची नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री परत परत सांगतायत राजकारण करू नका. कोण करतंय राजकारण???. सगळ्या पक्षातले लोकं आपआपल्या परीने मदत करतायत. कोण दाखऊन करत आहेत तर कोण न दाखवता. पण जर धान्य मिळत नसेल, राज्यात रुग्ण वाढत असतील, सरकारी कामात नियोजन दिसत नसेल तर सरकारला प्रश्न विचारले जाणारचं, असं निलेश राणे म्हणाले.
दरम्यान, कोरोनासंबंधी सरकारमध्ये समन्वय नाही. तसंच उपाययोजनांचा अभाव असल्याचं सांगत भाजप नेते सरकारवर निशाणा साधत आहेत. असं ट्विट करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.
मुख्यमंत्री परत परत सांगतायत राजकारण करू नका. कोण करतंय राजकारण???, सगळ्या पक्षातले लोकं आपआपल्या परीने मदत करतायत. कोण दाखऊन करत आहेत तर कोण न दाखवता. पण जर धान्य मिळत नसेल, राज्यात रुग्ण वाढत असतील, सरकारी कामात नियोजन दिसत नसेल तर सरकारला प्रश्न विचारले जाणारचं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 12, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“चंद्रकांतदादा, सगळा देश सध्या कोरोना विरोधात लढाई लढतोय… अन् तुम्हाला राजकारण सुचतंय”
“सांगलीत गणेश दर्शन घेण्यासाठी आलेल्या 53भक्तांना नोटिस”
तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो; मुख्यमंत्र्यांच जनतेला आवाहन
“संकटात आपला महाराष्ट्र हा देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो”