आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आला असून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. अशातच गोव्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
नाईक यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा काँग्रेससाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा : ग्रामीण भागातही मनसेची क्रेझ; अनेक युवकांनी हाती घेतला मनसेचा भगवा
गेल्या काही दिवसांपासून रवी नाईक काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हते. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीलाही ते गैरहजर होते. नाईक हे पोंडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो.
नाईक हे दुसऱ्यांदा भाजपमध्ये प्रवेश करतील. याअगोदर ऑक्टोबर 2000 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी मनोहर पर्रीकर सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते.तर नाईक यांच्या दोन्ही मुलांनी अगोदरच भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, 1991 ते 1993 दरम्यान आणि 1994 मध्ये 2 ते 4 एप्रिलदरम्यान रवी नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होते. ते 1998-99 दरम्यान लोकसभेचे सदस्यही राहिले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडी सरकार हे अपयशी सरकार; सुधीर मुनगंटीवार यांचा हल्लाबोल
भाजप नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढली; हर्षवर्धन पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट