नारायण राणेंचं ठरलं: बाळासाहेबांच्या आशीर्वादाने करणार यात्रेची सुरूवात

0
377

मुंबई :  केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्त्वात जन आशीर्वाद यात्रा येत्या 19 ऑगस्टपासून काढण्यात येणार आहे. या यात्रेचा शुभारंभ करण्यासाठी नारायण राणेंनी मोठा निर्णय घेतला आहे.

नारायण राणे यांच्या यात्रेची सुरूवात शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाच्या दर्शनाने करणार आहेत. विशेष म्हणजे राणे पहिल्यांदाच स्मृती स्थळावर येणार असल्याने सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेला शह देण्यासाठीच राणेंनी हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे राणेंच्या या यात्रांना कसा प्रतिसाद मिळतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्धवजी, माझ्या आई-वडीलांना वाचवा; पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्याची विनवणी”

मोदी नसते तर आज भारताची अवस्थाही अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगणा रणाैत

मराठा आरक्षणाबाबत अपयश लपविण्यासाठी शरद पवार यांनी…; चंद्रकांत पाटलांची टीका

पुणे जिल्ह्यात शिवसेनेला धक्का; शिवसेनेच्या ‘या’ आक्रमक महिला नेत्या लवकरच भाजपात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here