आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे राज्य सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे. आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असं आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यावरुन आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकार हे अपयशी सरकार आहे. त्यांच्या एकाही कामात यश नाही. मग ते कोरोनाचे संकट असो किंवा ओबीसींचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण. प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरणारे हे आघाडी सरकार आहे. यांचा स्वभाव फक्त रडायचा आहे, लढायचा नाही. यश मिळवणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही मुद्द्यावर हे सरकार गंभीर नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : भाजप नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढली; हर्षवर्धन पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट
हे सरकार कधी तक्रार करण्यासाठी, तर कधी टीका करण्यासाठी पत्रकार परिषदा घेतात. सकारात्मक बाबीसाठी या लोकांनी एकदा तरी पत्रकार परिषद घेतली का?, महाराष्ट्राची प्रगती व्हावी, जनतेला न्याय द्यावा, शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी या सरकारने आजवर कधीच भाष्य केले नाही. यांचे भाष्य फक्त केंद्र सरकारने पैसे दिले नाहीत. याला कर्तृत्व म्हणावे का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केले, आपणही कर कमी करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा द्यावा, असे या सरकारला कधी वाटले नाही. तसेच ओबीसी आरक्षणासारख्या एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सर्वांना सोबत घेऊन बैठक घ्यावी, तोडगा काढावा, विचारांचे आदानप्रदान करावे, असे एकही काम या सरकारने केले नाही, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळं मला तुरूंगात टाकलं; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा दावा”
“जैन मुनी पदम सागरजी महाराज ‘शिवतीर्थ’वर; राज ठाकरेंनी पुणे दाैरा अर्धवट सोडला”