Home महाराष्ट्र माझी शिफारस नसल्यामुळं शिवेंद्रराजेंना अध्यक्षपद मिळू शकलं नाही; शशिकांत शिंदेंचा टोला

माझी शिफारस नसल्यामुळं शिवेंद्रराजेंना अध्यक्षपद मिळू शकलं नाही; शशिकांत शिंदेंचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची चार दिवसांपूर्वी भेट घेतली होती.

हे ही वाचा : …तर ओबीसींना आरक्षण परत मिळू शकते; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला पर्याय

या भेटीत शिवेंद्रराजेंनी सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर संधी देण्याची मागणी या शरद पवारांना केली होती. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी शिवेंद्रराजेंना मिळणार का? याबाबत चर्चा सूरू होत्या. मात्र शरद पवारांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीच्या नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पवारांच्या या निर्णयामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला आहे.

मी निवडून आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस पवार साहेबांच्याकडे करु शकलो असतो. या आधी शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते तेव्हा सुद्धा पवार साहेबांच्याकडे मीच शिफारस केली होती, असं शशिकांत शिंदे म्हणाले. तसेच यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा टोला शशिकांत शिंदेंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“‘ती’ बाई स्वातंत्र्याला भीक म्हणाली तेव्हा साहित्यिक गप्प का?”

बाळासाहेब ठाकरेंना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; ‘या’ नेत्याची मागणी

मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कॅबिनेट मंत्रीपदाची दिली ऑफर; ‘या’ नेत्यानं केला गाैफ्यस्फोट