आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तीन दिवसांपूर्वी भेट घेतली होती.
हे ही वाचा : राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; मनसेचा पुण्यात दोन दिवस मेळावा
या भेटीत शिवेंद्रराजेंनी सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर संधी देण्याची मागणी या शरद पवारांना केली होती. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी शिवेंद्रराजेंना मिळणार का? याबाबत चर्चा सूरू होत्या. मात्र शरद पवारांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीच्या नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर बँकेच्या उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची निवड करण्यात आली आहे. पवारांच्या या निर्णयामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपद हे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले हे सांभाळत होते. तसेच यंदाही शिवेंद्रराजे यांना अध्यक्षपदाची आशा होती. बँकेचे अध्यक्षपद मिळावे यासाठी त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचीही भेट घेतली. मात्र शेवटी शिवेंद्रराजे भोसले यावेळी अपयश पदरात आलं.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना UPA मध्ये सहभागी झाली तरीही फरक पडणार नाही- नारायण राणे
भाजप-मनसेचं आता मिशन पुणे; देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे आज पुण्यात; रणनीती आखणार
राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचं वारं; रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत अनेक महिलांचा राष्ट्रवादीत प्रवेश