आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रातील सहा विभागांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे हे आज पुण्यात आले होते.
राज ठाकरेंचा पुण्यात दिवसभर पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचा कार्यक्रम होता. त्यानंतर सायंकाळी ते नाशिकला जाणार होते. मात्र राज ठाकरे यांचा नाशिक दौरा पुढे ढकलला असून, ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
हे ही वाचा : शिवसेना UPA मध्ये सहभागी झाली तरीही फरक पडणार नाही- नारायण राणे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग ते पुण्यातून फुंकणार आहेत. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा सुरुवात 15 आणि 16 डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या मेळाव्यातून होणार आहे. या दौऱ्यात ते पश्चिम महाराष्ट्रात मनसेची मोट बांधणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. यावेळी उपशहराध्यक्ष, नगरसेवक आणि विभागप्रमुखांशी राज ठाकरे थेट संवाद साधणार आहेत.
दरम्यान, 15 आणि 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्यात ते पुणे विभागातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
भाजप-मनसेचं आता मिशन पुणे; देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे आज पुण्यात; रणनीती आखणार
राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचं वारं; रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत अनेक महिलांचा राष्ट्रवादीत प्रवेश
“मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचं भांडवल करणं हे भाजपच्या नेत्यांना चांगलं जमतंय”