Home महाराष्ट्र “मुंबई महापालिकेची निवडणूक संपल्यावर महाविकास आघाडी सरकार कोसळेल”

“मुंबई महापालिकेची निवडणूक संपल्यावर महाविकास आघाडी सरकार कोसळेल”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोणावळा : राज्यातील महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुका संपल्या की मार्चच्या आसपास राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असं नवं भाकीत रामदास आठवले यांनी केलं आहे. लोणावळा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर मीडियाशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी हे भाकीत केलं आहे.

हे ही वाचा : “मनसेचं आता नवं मिशन; 40 हून अधिक समुद्रकिनारे स्वच्छ करणार”

महाविकासआघाडीची सत्ता फार काळ टिकणार नाही. त्यामुळे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला भाजप-शिवसेनेनं अवलंबवावा. मुंबई महानगरपालिका निवडणुका संपल्या की चित्र बदलेल. मार्चच्या आसपास महाविकासआघाडी सरकार पडेल आणि भाजप सत्तेत येईल, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनीही मार्चमध्ये सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं होतं. त्यानंतर आठवले यांनी मार्चमध्येच सरकार कोसळणार असल्याचं सांगितल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; सावली नगरपंचायतच्या नगरसेवकांसह अनेकांचा भाजपात प्रवेश

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार; करुणा शर्मा पत्रकार परिषद घेत करणार मोठा खुलासा

मनसेचं लक्ष्य पुणे महापालिकेवर; राज ठाकरे पुणे दौरा, उद्या निवडणुकीची आखणार रणनीती