आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : जिल्हा परिषदेसह नगरपंचायत व पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसनेही जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसनेही स्वबळावर आणि पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे 41 सदस्य, तर काँग्रेसचे 7 सदस्य आहेत. भाजपाचे 6 तर शिवसेनेचे 2 सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली. मात्र, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी पाळली नसल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेकडून सातत्याने केला जात आहे.
हे ही वाचा : भाजपचा महाविकास आघाडीला धक्का ; जिल्हा बॅंकेच्या संचालकाचा भाजपात प्रवेश
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय या दोन्ही पक्षांना आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह नगरपंचायत व पालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला हिसका दाखवण्यासाठी शिवसेना व काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे.
शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्यासह तीन जिल्हाप्रमुखांनी स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भाजपाने आपली सहा सदस्यसंख्या 10 ते 20 पर्यंत नेण्याची तयारी केली आहे. त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार आहे. यावेळी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाजपसोबत राहणार की राष्ट्रवादीसोबत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
‘फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांनाच सत्तेची घाई, अन्…’; जयंत पाटलांचा खोचक टोला
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला धक्का; भाजप नगरसेविका राष्ट्रवादीच्या वाटेकर? मात्र…
देवेंद्र फडणवीसांच्या रडगाण्याशी आम्हांला काही घेणं देणं नाही; विनायक राऊतांचा टोला