Home महाराष्ट्र मुंबईत भाजप-शिवसेना नगरसेवकांमध्ये जोरदार राडा

मुंबईत भाजप-शिवसेना नगरसेवकांमध्ये जोरदार राडा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना भाजप नगरसेवकांनी घेरलं. त्यामुळे महपालिकेच्या सभागृहाबाहेर भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला.

नायर रुग्णालयात उपचाराअभावी 4 महिन्यांच्या बाळाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. हे बाळ त्याच्या परिवारासह वरळीतील सिलिंडर ब्लास्टच्या घटनेत जखमी झालं होतं. या घटनेवरुन भाजप नगरसेवकानं आरोग्य समितीचा राजीनामा दिली होता. त्याविषयी बोलताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपचे लोक राजीनामा देतात, आम्ही सेनेचे लोक मात्र लढतो, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन भाजपचे नगरसेवक चिडले त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने आले होते.

हे ही वाचा : मनसे कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा; राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

आण्णाभाऊ साठे सभागृहाबाहेर हा राडा पाहायला मिळाला. दोन्ही बाजूच्या नगरसेवकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणबाजी झाली. नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा जीव गेल्याचा आरोप भाजपनं केलाय. या घटनेचा भाजपकडून निषेधही करण्यात आलाय.

दरम्यान, भाजप नगरसेवकांने आरोग्य समितीचाही राजीनामा दिला आहे. याबाबत यशवंत जाधव यांनी महापौरांनी कारवाईचे आदेश दिल्याचं सांगितलं. पण भाजपकडून राजकारण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

महत्वाच्या घडामोडी –

“पुण्यात केवळ शनिवारवाडाच नाही तर…”; अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

शिवसेनेने घेतलेल्या ‘या’ भूमिकेला काँग्रेसचं समर्थन

रोहित पवारांना मिळणार मंत्रिपद?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण