Home महाराष्ट्र शिवसेनेने घेतलेल्या ‘या’ भूमिकेला काँग्रेसचं समर्थन

शिवसेनेने घेतलेल्या ‘या’ भूमिकेला काँग्रेसचं समर्थन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर ममतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली. त्यावेळी ममतांनी देशात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले होते. यावर शिवसेनेकडून तीव्र शब्दांमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे.

यूपीए नाही तसा एनडीएही नाही. मोदींच्या पक्षाला एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपाचे हात बळकट करण्यासारखेच आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेचे काँग्रेसनेही समर्थन केलं आहे.

हे ही वाचा : रोहित पवारांना मिळणार मंत्रिपद?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

देशाला भाजपविरोधात मजबूत पर्याय द्यायचा असेल तर तो कॉंग्रेसला वगळून जमणार नाही. देश विकणाऱ्यांसोबत आज कोणताही पक्ष उभा राहणार नाही, देशाला वाचवण्याचे काम फक्त कॉंग्रेस करु शकते, म्हणून शिवसेनेची भूमिका योग्य आहे, असं म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

दरम्यान, शिवसेनेने सामनातून केलेली टीका अगदी योग्य आहे. ती देशहितासाठी घेतली असून पक्ष किंवा सरकार वाचवण्यासाठी घेतलेली नाही. कॉंग्रेसच देश वाचवू शकतो. आता देशानेच ठरवायचे आहे त्यांना देश विकणाऱ्यांसोबत जायचे की वाचवणाऱ्यांसोबत, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर भाजपला समर्थ पर्याय देण्याच्या बाता कुणी करू नयेत”

अखेर कंगणाला माफी मागावीच लागली, शेतकऱ्यांनी अडवली गाडी आणि…; पहा व्हिडिओ

पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा, आरपीआयचा निळा झेंडा फडकणार- देवेंद्र फडणवीस