Home महाराष्ट्र “शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”

“शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेयांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : राजकारणात कुणाला घाबरत नाहीत, पण देवेंद्र फडणवीसांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर संधी देण्याची मागणी यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी शरद पवारांना केली आहे. मात्र त्यापूर्वी शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.

बॅंकेच्या अध्यक्ष पदावर मला संधी देण्यात यावी, अशी मागणी शिवेंद्रराजेंनी केली आहे. तसेच येत्या काळात बॅंकेचे कामकाज चांगल्या पध्दतीने हाताळणार असल्याचं शिवेंद्रराजे म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी मी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलून ठरवतो, असं सांगितलें. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनीही अजित पवार व रामराजेंशी बोलतो, असं आश्वासन शिवेंद्रराजेंना दिलं. त्यामुळे आता शिवेंद्रराजेंना अध्यक्षपद मिळणार का?, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; पालघरमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला सेनेचा भगवा

“… त्यामुळे 2024 ला मोदीचं सत्तेत येणार आहेत”

पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात; सदाभाऊ खोत यांची टीका