आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दाैऱ्यावर आहेत. या दाैऱ्यात त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्यानं राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं. तसेच या भेटीनंतर शिवसेना-राष्ट्रवादी हे काँग्रेसला डावलून तृणमूलसोबत आघाडी करणार अशा चर्चा सूरू झाल्या. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : अनैतिक संबंधाला मान्यता देण्यासाठी पत्नीचा पतीवर दबाव; मानसिक छळातून डॉक्टरची आत्महत्या
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा हा उद्योगपतींशी चर्चा करण्यापेक्षा भाजपविरोधी पक्षांची आघाडी उभारण्याच्या राजकीय कारणांसाठीच होता. उद्योगांचे केवळ कारण होते, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला. तसेच मतांच्या लाचारीसाठी शिवसेनेला हिंदूत्वविरोधी पक्षांना साथ द्यावी लागत असून खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशात भाजपविरोधात काँग्रेसला वगळूनच आघाडी करायची आहे. पण महाराष्ट्रात सरकारमध्ये काँग्रेस असल्याने त्यांची अडचण झाल्याचा दावाही फडणवीसांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेचे किती निवडून आले? 56 अन् आमचे…; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला!
एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीचे नेते, पण भाजप मनातून जाता जाईना!
मनसेचं खळखट्याक, वसईत मनसेने केला भेसळयुक्त तेलाचा पर्दाफाश; पाहा व्हिडिओ