आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : अविनाश देशमुख या डॉक्टरने 12 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी केली होती. या प्रकरणी टिटवाळा पोलिसात आत्महत्येची नोंद करीत पुढील तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी या आत्महत्येमागील धक्कादायक खुलासा केला आहे.
डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्यास टिटवाळा पोलिसांना यश आलं असून आपल्या अनैतिक संबंधांना मान्यता द्यावी म्हणून पत्नी आणि तिची आई डॉक्टरवर मानसिक दबाव आणत होत्या. याच मानसिक त्रासाला कंटाळून डॉक्टरने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
हे ही वाचा : शिवसेनेचे किती निवडून आले? 56 अन् आमचे…; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला!
टिटवाळा पूर्वेला नारायण रोड परिसरात मोहन हाईट्स या इमारतीत डॉ. अविनाश देशमुख हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. अविनाश यांची पत्नीही डॉक्टर आहे. अविनाश हे इंदिरा नगर परिसरात आपली डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत होते. अविनाश यांच्या पत्नी डॉ. शुभांगी देशमुख हिचे आपल्या मामे भावासोबत अनैतिक संबंध होते. हे संबंध आपल्या पतीने मान्य करावे यासाठी डॉक्टर पत्नी आणि तिची आई डॉ. अविनाश यांच्यावर दबाव टाकत होत्या.
दरम्यान, यावरुन त्यांचा मानसिक छळही करीत होत्या. याशिवाय सासू-सासऱ्यांसोबत रहायचे नाही, त्यामुळे वेगळे घर घे, असा तगादाही शुभांगी हिने पतीकडे लावला होता. या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. अविनाश देशमुख यांनी राहत्या घरातील बेडरुममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
महत्वाच्या घडामोडी –
एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीचे नेते, पण भाजप मनातून जाता जाईना!
मनसेचं खळखट्याक, वसईत मनसेने केला भेसळयुक्त तेलाचा पर्दाफाश; पाहा व्हिडिओ
…म्हणून ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करा; भाजप आमदार अतुल भातखळकर यांची पोलिसांत तक्रार