Home जळगाव एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीचे नेते, पण भाजप मनातून जाता जाईना!

एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीचे नेते, पण भाजप मनातून जाता जाईना!

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : भाजप नेत्यांवर जोरदार हल्ले चढवत आणि गंभीर आरोप करत एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खरा. पण आजही खडसेंच्या मनातून भाजप जात नसल्याचं पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा : मनसेचं खळखट्याक, वसईत मनसेने केला भेसळयुक्त तेलाचा पर्दाफाश; पाहा व्हिडिओ

जळगाव बँकेच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करण्याऐवजी चुकून भाजपचा उल्लेख केला. त्यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी अजूनही डोक्यातून भाजप जात नसल्याचं म्हटलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, जळगावमधील अजिंठा शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी सर्वात आधी संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. त्यानुसार तीन वर्षांसाठी बँकेचं अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे राहणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षे अध्यक्षपद हे शिवसेनेकडे असणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करा; भाजप आमदार अतुल भातखळकर यांची पोलिसांत तक्रार

काँग्रेसला सल्ला द्यावा ऐवढी नवाब मलिक यांची पात्रता नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

‘…हा शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह’; आशिष शेलारांची घणाघाती टीका