आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट 1971 च्या कलम 3 नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिंडोशी पोलीस स्टेशनला केली आहे.
काल मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली.
हे ही वाचा : काँग्रेसला सल्ला द्यावा ऐवढी नवाब मलिक यांची पात्रता नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार
‘जन गण मन अधिनायक जय है’, असं त्या बसून म्हणाल्या. त्यानंतर त्या बोलता बोलता जागेवरुन उठल्या. यावेळी त्या राष्ट्रगीच्या उर्वरित ओळी बोलू लागल्या. भारत भाग्यविधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग, इथपर्यंतच त्या राष्ट्रगीत म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी ‘जय महाराष्ट्र, जय बंगाल, जय भारत’, अशी घोषणा केली.
दरम्यान, त्यामुळे हा अत्यंत गंभीर प्रकार असून बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांचा व रोहिंग्या मुस्लिमांचा कायमच कळवळा असणाऱ्या व देशविघातक किंवा हिंदूविरोधी शक्तींना पाठबळ देणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी अशा प्रकारे राष्ट्रगीताचा अवमान करून तमाम भारतीयांच्या भावनांना ठेच पोहचविण्याचे काम केले आहे, असंही भातखळकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
‘…हा शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह’; आशिष शेलारांची घणाघाती टीका
ममता बॅनर्जी म्हणाल्या, यूपीए कुठे अस्तित्वात आहे?; आता संजय राऊत, म्हणतात…
राष्ट्रवादीचा भारिपला मोठा खिंडार; भारिपच्या 23 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश