आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग बाहेर घेऊन जाणार आणि इथे वडापाव खायला घालणार का? असं वक्तव्य भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलं होतं. त्याला आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईत आले आहेत. मुंबईत येऊन त्यांनी उद्योगपतींच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यावरून क्लाईड क्रास्टो यांनी आशिष शेलार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
हे ही वाचा : काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याचा आता राष्ट्रवादीत प्रवेश”
गुजरातचे मुख्यमंत्री आता गुजरातला उद्योग घेऊन चालले आहेत. आशिष शेलार तुम्ही गुजराती शिकून घ्या नाहीतर कधी तुम्हाला गुजरात दाखवतील पत्ता लागणार नाही, असं क्लाईड क्रास्टो म्हणाले आहेत.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावरून अशिष शेलार यांनी टीका केली होती. महाराष्ट्रातील रोजगार, व्यवसाय, इंडस्ट्रीज इथून घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना ममतादिदींना मदत करते आहे काय? महाराष्ट्रात कँग्रेसला ना स्थान, ना इज्जत, ना किंमत, ना स्थिती त्यामुळे काँग्रेसला काय ते त्यांचे त्यांनी ठरवावे. आमचा सवाल महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्ट्रातील तरुणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय?, असा संतप्त सवाल शेलार यांनी केला होता.
महत्वाच्या घडामोडी –
“माजी पोलिस आयुक्त परबमीर सिंग यांना दणका; निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी केली सही”
“आगामी निवडणुकीतही काँग्रेसला 300 जागा मिळणार नाहीत; ‘या’ मोठ्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर”