आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सत्तेत दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. द्विवर्षपूर्तीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला आहे. यावरून भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडलंय.
हे ही वाचा : …म्हणून रामदास आठवलेंनी घेतली अमित शहांची भेट
गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात ठाकरे सरकारने दबावाच आणि दडपशाहीचे राजकारण केल्याची टीका करत विकासकामांच्या नावावर अधिकाऱ्यांवर दबाव टाकून करोडो रुपये पाण्यासारखे खर्चीले जात असल्याचा आरोप गणेश नाईक यांनी यावेळी केला.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर अनावश्यक कामे करण्यासाठी दबाव टाकला जातो आहे, वरिष्ठांकडून परवानगी घेतली जाते आणि फोन केले जातात, असंही गणेश नाईक म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
आदित्य ठाकरे – ममता बॅनर्जी यांच्यातील बंद दाराआड चर्चेवर भाजप आक्रमक ; केली ‘ही’ मागणी
शरद पवारांइतकीच राजकीय उंची असलेल्या ममता बॅनर्जी या एकमेव नेत्या; संजय राऊतांकडून काैतुक
“शिवसेनेत पक्षप्रवेशाचं वादळ; वैभववाडीत अनेक कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”