सतेज पाटील जोपर्यंत घरफाळा भरत नाहीत, तोपर्यंत कुणीही भरु नका- धनंजय महाडिक

0
186

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अशातच सतेज पाटील जोपर्यंत घरफाळा भरत नाहीत, तोपर्यंत कुणीही भरु नका, असं धनंजय महाडिक म्हणाले.

सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे डीवायपी मॉलमध्ये गाळा आहे. या गाळ्यातील घरफळ्यात महापालिकेची 15 ते 16 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या गाळ्यासंदर्भातील माहिती सतेज पाटील यांनी लपवून ठेवली. तसेच महापालिकेची कोट्यावधी रुपयांची लूट केल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी केला आहे.

दरम्यान, सतेज पाटील यांनी येत्या 10 दिवसात फसवणूक केलेली ही रक्कम दंडासह वसूल करावी. अन्यथा कोल्हापूर महानगरपालिकेसमोर आंदोलन करु, असा इशारा धनंजय महाडिकांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

भारताचा इंग्लंडवर विजय; सामना जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात धडक

“मास्क का वापरायचा नाही याचं ठोस कारण राज ठाकरेंनी सांगावं”

…नाहीतर काही लोक स्वत:साठी मागतात; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला

राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू, कुणालाच कुणाचा धाक उरला नाही- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here