आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आजपासून मुंबईत आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर ममता बॅनर्जी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बरोबर ममता बॅनर्जी यांना भेटलो. राजकारण व बंगाल महाराष्ट्र नात्यावर चर्चा झाली. ममताजी आज सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. तेथे त्यांनी उद्धवजींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र -बंगाल हे लढणारे प्रदेश आहेत, झुकणारे नाहीत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.त्यामुळे आगामी काळात भाजप विरोधात प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन ममता बॅनर्जी मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
हे ही वाचा : नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज मुंबईमध्ये आल्या आहेत. जेव्हाही मुंबईच्या दौऱ्यावर त्या येतात तेव्हा आम्ही त्यांची भेट घेत असतो. आमच्यात एक वेगळे नाते आहे. आज कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या बैठकीत औपचारिक चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये चांगला संवाद आहे. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र, मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे भेट होऊ शकली नाही, असं आदित्य ठाकरे यांनी भेटीनंतर म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?; भाजप नेत्याचा सवाल
भाजपा-शिवसेना यांच्यात पुन्हा मैत्री होणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…