बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा जनतेच्या नशिबात आघाडीची सजा; नितेश राणेंचा टोला

0
340

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा जनतेच्या नशिबात आघाडीची सजा, पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी काम करी, असं म्हणत भाजप नेते  नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी आपल्या या ट्विटमध्ये एक व्यंगचित्र देखील शेअर केले आहे.या व्यंगचित्रामध्ये आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत. ते विमानातून खाली पाहात आहेत. तर खाली चार व्यक्ती दाखवण्यात आले आहेत, त्यामध्ये एक शेतकरी आहे, दुसरा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, या व्यंगचित्रामध्ये हे सर्वजण हात जोडून आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दिसत आहेत. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर करताना राणे यांनी बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, सामान्य जनता भोगतीये महाविकास आघाडीची सजा असं म्हणत आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

 महत्वाच्या घडामोडी –

राज्यातील तीन पक्षाच्या सरकारलाही आमचा धाक- चंद्रकांत पाटील

उल्हासनगरमध्ये चौकाचौकात झळकणार राष्ट्रवादीचे चमकणारे घड्याळ

सत्तेचा माज चढला असेल तर सरकारमधून बाहेर पडा; राष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here