आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून महाराष्ट्राच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. तसेच ममता बॅनर्जी या काही राजकीय आणि व्यावसायिक भेटीगाठी घेणार आहेत. यातील सर्वात महत्वाची भेट आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची.
हे ही वाचा : गिरीश महाजन म्हणाले, शिवसेनेसोबतचा आमचा 25 वर्षांचा संसार तोडला, आता जयंत पाटील म्हणतात…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अलिकडेच सर्जरी झालीय. त्यामुळे दोघांची भेट होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय. पण ममता बॅनर्जींच्या भेटीनं महाराष्ट्राच्या राजकीय चर्चांना उधाण आलंय.
ममता बॅनर्जी या पुढचे 3 दिवस त्या मुंबईतच असणार आहेत. या तीन दिवसाच्या काळात सर्वात महत्वाची राजकीय भेट असेल ती म्हणजे शरद पवार यांच्यासोबत. ममता बॅनर्जींच्या प्रचारासाठी शरद पवार हे पश्चिम बंगालला गेले होते आणि त्यानंतर आता ममता ह्या पवारांच्या भेटीसाठी मुंबईत असतील., त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यातील निर्बंध वाढणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान, म्हणाले…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण