आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजपात प्रवेश करणाऱ्या माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 10 नगरसेवकांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. यामुळे शिवसेनेला मोठा दणका बसलाय.
रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी 29 ऑक्टोबर रोजी या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला भाजपाने आव्हान दिलं होतं.
हे ही वाचा : शिवसेनेविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करा; मनसेची पोलिसांकडे तक्रार
माथेरान नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व आरोग्य सभापती आकाश कन्हैया चौधरी, नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, सोनम दाभेकर, महिला बालकल्याण समितीचे सभापती, प्रतिभा घावरे, शिक्षण समितीचे सभापती, रूपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियंका कदम, ज्योती सोनावळे यांनी शिवसेना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, या पक्षांतराच्या विरोधात माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे पक्षांतरबंदी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती.
महत्वाच्या घडामोडी –
महिलांवरील अत्याचार वाढण्यास महाआघाडी सरकारच जबाबदार; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
अमृता फडणवीस राजकारणात येणार का?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“मंत्र्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार, मात्र एसटी कर्मचाऱ्याला केवळ 12 हजार पगार हे चुकीचंच”