Home महाराष्ट्र “मंत्र्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार, मात्र एसटी कर्मचाऱ्याला केवळ 12 हजार पगार...

“मंत्र्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार, मात्र एसटी कर्मचाऱ्याला केवळ 12 हजार पगार हे चुकीचंच”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

ठाकरे सरकारनं पगारवाढ जाहीर करूनही एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विलीनीकरण वगळता इतर मागण्या मान्य झाल्याचे जाहीर करताच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केलं होतं. तरीही कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. यावरून आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : राज्यसभेत गोंधळ; शिवसेनेचे 2 तर काँग्रेसचे 6 खासदारन निलंबित

मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार हे चुकीचंच असल्याचं बच्चू कडू म्हणाले. सांगलीच्या इस्लामपूरमधील कृषी प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार पगार मिळतो. पण जो एसटी कर्मचारी हजारो लोकांना घेऊन प्रवास करतो, त्याला फक्त 12 हजार पगार मिळत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. पण आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंदोलन माघे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू, असं बच्चू कडू म्हणाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर फक्त 8 तास वीज मिळत असेल आणि पूर्ण बिलाची वसूली केली जात असेल तर ते चुकीचं आहे. सरकार नक्की त्यावर विचार करेल, असंही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले?; आदित्य ठाकरेंनी आकडा सांगितल्यावर प्रशासन हादरलं”

आम्ही पाडणार नाही, महाविकास आघाडी सरकार आपल्या अंतर्विरोधानेच पडेल- देवेंद्र फडणवीस

“चंद्रकांत पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेद्वाराची भेट, चर्चांना उधाण”