आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कोरोनाच्या नवा विषाणू ओम्रिकाॅननं संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम हा नवा व्हेरिएंट आढळून आला. त्यामुळे आफ्रिकेचा समावेश ऍट रिस्क देशांच्या यादीत करण्यात आला आहे.
हे ही वाचा : आम्ही पाडणार नाही, महाविकास आघाडी सरकार आपल्या अंतर्विरोधानेच पडेल- देवेंद्र फडणवीस
विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झालेल्यांची संख्या मोठी आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
10 नोव्हेंबरपासून एक हजार प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतून दाखल झालेल्या हजार प्रवाशांपैकी किती जण मुंबईत आहेत, किती जण शहराबाहेर गेले, तसेच ते कोणाच्या संपर्कात आले, याचा शोध प्रशानाकडून घेतला जात असल्याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“चंद्रकांत पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेद्वाराची भेट, चर्चांना उधाण”
“संजय राऊतांच्या कन्येच्या शाही विवाह सोहळ्याला राज ठाकरेंसह अनेक दिग्गजांची हजेरी”
राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार का?; राजेश टोपेंचं मोठं विधान, म्हणाले…