आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यावरून महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही सरकार पाडणार नाही, हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : “चंद्रकांत पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेद्वाराची भेट, चर्चांना उधाण”
सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ती अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार अंतर्विरोधाने पडतात त्यावेळी आज पडेल की उद्या पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा सरकार सर्वात मजबूत आहे असं वाटतं तेव्हाच ते पडतं. जेव्हा आता पडेल असं वाटतं तेव्हा ते टिकतं. त्यामुळे ही अशी सरकारे टिकत नाहीत. ते आपल्या अंतर्विरोधानेच पडेल. पहिल्या दिवशीपासून सांगतोय आम्ही सरकार पाडणार नाही. ज्या दिवशी सरकार पडेल. तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ’., असं फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“संजय राऊतांच्या कन्येच्या शाही विवाह सोहळ्याला राज ठाकरेंसह अनेक दिग्गजांची हजेरी”
राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार का?; राजेश टोपेंचं मोठं विधान, म्हणाले…
महाविकास आघाडीतील आणखी 4 नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार- किरीट सोमय्या