Home महाराष्ट्र भाजपचा राष्ट्रवाद बोगस, त्यांना पुन्हा वर्ण व्यवस्था आणायची आहे; नवाब मलिक यांचा...

भाजपचा राष्ट्रवाद बोगस, त्यांना पुन्हा वर्ण व्यवस्था आणायची आहे; नवाब मलिक यांचा आरोप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई: भाजपाचा राष्ट्रवाद हा मनूवादी भूमिका जाहीर करणारा आहे. त्यांना समाजात पुन्हा वर्ण व्यवस्था आणि जातीभेद आणायचा आहे. हा बोगस राष्ट्रवाद असून तो कधीच आम्ही मान्य करणार नाही, असं म्हणत राष्ट्रावादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी  भाजपावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : नारायण राणेंनी मार्च ही मुदत जास्तच दिली, त्याबद्दल त्यांचे आभार- जयंत पाटील

भारत एक धर्मनिरपेक्ष, समाजवादी लोकशाही व्यवस्था निर्माण करणारा देश राहिल. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद आहे. आपला राष्ट्रवाद हा राज्यघटनेला बांधिल असणारा आहे. त्या राष्ट्रवादासाठी आपल्याला लढा दयायचा आहे, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाने संविधा दिना निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी मलिक यांनी भाजपवर सडकून टीका केली.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर-राजे निंबाळकर यांची नियुक्ती”

“संप आता लवकरच मिटणार?; एसटी कर्मचारी आणि सरकारमध्ये चर्चेस पुन्हा सूरूवात”

शिवेंद्रराजे भोसलेंमुळंच माझा पराभव झाला; आमदार शशिकांत शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट