आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला येत्या 28 डिसेंबर रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत अनेक विषयांवर मनसोक्तपणे मते मांडली. यावेळी भाजपाला थेट ऑफर राऊतांनी भाजपाला दिली आहे.
सरकार पडणार अशा पुड्या भाजपा सोडत असते, पण याची काय गरज आहे? संसदीय लोकशाही प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षाचे स्थानसुद्धा खूप महत्त्वाचे असते. विरोधी पक्षनेता हा शॅडो चीफ मिनिस्टर असतो आणि तुमचा तेवढा ताकदीचा विरोधी पक्ष आहे. तुम्ही राज्य आपल्या मुठीत ठेवले पाहिजे, ज्या प्रकारे तुम्ही फालतू चिखलफेक करता, धुराळा उडवता ते भाजपाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : नारायण राणेंच्या म्हणण्यानुसार सरकार चालत नाही, तर…; शिवसेनेचं प्रत्युत्तर
आम्ही केंद्रात आणि महाराष्ट्रात असताना खूप विरोधी पक्षनेते पाहिले आणि आम्हाला असे वाटायचे की, राज्यात मंत्री किंवा मुख्यमंत्री होण्यापेक्षा कधी तरी विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे. भाजपाला सुदैवाने हे सर्व मिळाले आहे, तर यांनी राज्यावर आमच्यासोबत रुल केले पाहिजे. तेसुद्धा विरोधी पक्ष म्हणून राज्यावर रुल करू शकतात, त्यांच्या विधायक कामांचा उद्धव ठाकरे नक्कीच आदर करतील, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपाला थेट ऑफर दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
संप बेकायदेशीर ठरविल्यास एका दिवसाला 8 दिवसांचा पगार कापणार- अनिल परब
राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपची सत्ता येणार; नाना पटोले म्हणतात..
“शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीची धाड”