सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल 3 दिवसांपूर्वी जाहीर झाले. यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर शशिकांत शिंदेंवर जोरदार टीका होत होती. यावरून आता स्वत: शशिकांत शिंदेंनी स्वत: प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : भाजपाने आमच्यासोबत मिळून राज्य करावे; संजय राऊतांची भाजपाला खुली ऑफर
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे माझा पराभव झाला, हे त्यांचेच षडयंत्र आहे. आणि हे 100 टक्के खरं आहे, असा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी केला. जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी आज सातारा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा गाैफ्यस्फोट केला.
एकाच दिवसात सगळे अर्ज निघाले आणि हे बिनविरोध कसे झाले याचा शोध घ्यायला हवा. सहकार पॅनेलचे इतर उमेदवारही पडले, त्यासंदर्भात पॅनेल प्रमुखांनी खुलासा करायला हवा होता. मात्र, त्यांनी न केल्यानं मला भूमिका घ्यावी लागत आहे. मी पराभूत झाल्यावर काहीजण नृत्यात सहभागी झाले होते. त्यामुळे षडयंत्राचा मुख्य सुत्रधार कोण हे शोधावे लागेल. शिवेंद्रराजे यांच्याविषयी पक्षाने भूमिका जाहीर करावी, मी सरळपणाने निवडणूक लढवली, कोणतीही दादागिरी केली नाही., असं शशिकांत शिंदेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणेंच्या म्हणण्यानुसार सरकार चालत नाही, तर…; शिवसेनेचं प्रत्युत्तर
संप बेकायदेशीर ठरविल्यास एका दिवसाला 8 दिवसांचा पगार कापणार- अनिल परब
राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपची सत्ता येणार; नाना पटोले म्हणतात..