Home महाराष्ट्र “शिवसेनेच्या माजी नगरसेवकासाठी भाजप-मनसे मैदानात; चर्चांना उधाण”

“शिवसेनेच्या माजी नगरसेवकासाठी भाजप-मनसे मैदानात; चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सध्या राजकीय वातावरणात भाजप आणि मनसेचे नेते सत्ताधारी शिवसेनेवर सातत्यानं आरोप-प्रत्यारोप करत असताना आपण पाहिलं आहे. मात्र आता कल्याणमध्ये मनसे आणि भाजपच्या दोन्ही पक्षांचे नेते शिवसेनेच्या माजी नगरसेवकासाठी मैदानात उतरल्याचं पहायला मिळत आहे.

कल्याणजवळ असलेल्या मोहने परिसरात मंदिराच्या बांधकामावर कारवाई केल्याच्या संतापातून शिवसेनेचे माजी नगरसेवक मुकूंद कोट यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक मुकंद कोट आणि त्यांच्या पत्नी व मनसे नगरसेविका सुनंदा कोट यांच्यासह 15 जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यानंतर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कोट यांना पाठिंबा दिल्यानं अनेकांच्या भुवय्या उंचावल्या.

हे ही वाचा : राष्ट्रवादीची कंगनाविरुद्ध बोरीवलीच्या न्यायालयात तक्रार

दुत्व आणि मंदिरासाठी मुकुंद कोट यांची भूमिका फार महत्वाची असल्याने आम्ही त्यांच्यासोबत असल्याचं आमदार चव्हाण म्हणाले. तर राजू पाटील यांनीही यावर जोरदार भाष्य केलं.

कल्याणमध्ये अनेक ठिकणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. मात्र त्यावर कारवाई सोडून मंदिरावर कारवाई करणार तर नागरिकांच्या संतापला समोर जावे लागले, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकेल; नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा 1 डिसेंबरपासून सूरू होणार”

सुशांत सिंग राजपूतची हत्या होऊनही मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मात्र…; नारायण राणेंचा गंभीर आरोप