आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावले होते. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही बघून घेईन, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना झापलं होतं. यावरून शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेचा पराभव का झाला?; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
नारायण राणेंनी वेळोवेळी सत्तेसाठी गद्दारी केल्याने गद्दारीवर उपदेश देण्याचा त्यांना अधिकार नाही, असा हल्लाबोल वैभव नाईक यांनी यावेळी केला.
दरम्यान, राजकारणात नारायण राणेंनी सत्तेसाठी शिवसेनेबरोबर गद्दारी केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्येही त्यांनी गद्दारी केली. त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला. वर्षभरातच स्वतःच्या कार्यकत्यांबरोबर गद्दारी करून राणे ईडीची कारवाई टाळण्यासाठी आणि सत्तेसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे पाहता राणेंनी त्या त्या पक्षातील अनेकांशी गद्दारी करूनच पदे मिळविली. त्यामुळे वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या राणेंनी गद्दारी या विषयावर बोलू नये आणि कोणाला उपदेशही देऊ नये, असा घणाघात वैभव नाईक यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; रत्नागिरीच्या माजी उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश”
“देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?”
…तर नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा; किरीट सोमय्यांचं थेट ठाकरे सरकारला आवाहन