आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे-भाजप युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशातच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे राज्यात पुन्हा मनसे-भाजप युती होणार, अशा चर्चा रंगल्या आहेत.
हे ही वाचा : …तर नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा; किरीट सोमय्यांचं थेट ठाकरे सरकारला आवाहन
काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी पोहचले आहेत. ही भेट कौटुंबिक असल्याचे म्हटले जात असले तरी दोन राजकीय नेते भेटत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांचे नवे घर बघण्यासाठी फडणवीस शिवतीर्थावर आले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच फडणवीस यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीसही आल्या आहेत. राज ठाकरे आणि शालिनी ठाकरे यांनी यावेळी दोघांचेही स्वागत केले.
महत्वाच्या घडामोडी –
“आगामी निवडणुकीच्याआधी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ दोन नेत्यांनी केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”
मंत्रालय बंद, ‘दुकानदारी’ सुरू; पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका
‘नाचता येईना, अंगण वाकडं’, अशी सरकारची अवस्था; प्रीतम मुंडेंचा घणाघात