आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय पाहायला मिळाला. 21 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 7 जागांवर शिवसेना, 2 जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झालाय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आनंद व्यक्त करत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खडसे यांनी जोरदार निशाणा साधलाय.
’40 वर्षे मी भाजप रुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र 40 वर्षे माझी अवहेलनाच केली गेली. पुढच्या कालखंडात नगरपालिका आणि जिल्हा परिषद आमच्या ताब्यात येईल. इतक्या वर्षात गिरीश महाजन हे त्यांच्या मतदारसंघात जाऊ शकले नाहीत. नेते होऊ शकले नाहीत. इतकी वर्षे संघर्ष, आंदोलन, भाषणं मी करत होतो. नाथाभाऊंना कुणीतरी स्पर्धक म्हणून गिरीश महाजनांना मोठं केलं जातंय, असं एकनाथ खडसे म्हणाले.
हे ही वाचा : महाविकास आघाडी सरकारला आता अवघे काही दिवस उरले आहेत- चंद्रकांत पाटील
दरम्यान, आतापर्यंत महाजनांना मीच मदत करत आलो. सरपंच होते तेव्हा पक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदतही मीच करत आलो. पक्षात नाथाभाऊ मोठे होत आहेत. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून काही नेत्यांनी महाजनांना मोठं केलं’, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय.
जळगाव जिल्हा सह. बँक निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. गत कालावधीत केलेल्या कार्याची पावती मतदारांनी व सभासदांनी दिली. त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार !@NCPspeaks @INCMaharashtra @ShivSena pic.twitter.com/udDYaqJtUw
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सचिन तेंडुलकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतिर्थ’वर
किरीट सोमय्यांचा दिल्ली दौरा; वाढवणार महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी?
“भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; मोठ्या नेत्यासह काही नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश?”