Home पुणे जे रिॲक्ट होत नाहीत त्यांना योग्य वेळी संधी मिळते’; पंकजाच्या त्या वक्तव्यानंतर...

जे रिॲक्ट होत नाहीत त्यांना योग्य वेळी संधी मिळते’; पंकजाच्या त्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांंचं सूचक विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल, पण पदासाठी हात फैलावणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत केलं होतं. विधानपरिषदेवर संधी न दिल्यामुळे पंकजा मुंडे असं बोलल्या असा कयास बांधण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांच्या याच नाराजीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय.

हे ही वाचा : शिवसेनेमुळेच औरंगाबादचा विकास झाला; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा!

पंकजा मुंडेंबाबत चुकीचे अर्थ लावण्याचे कारण नाही. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षानंतर मिळालं. संघटनेची जबाबदारी आम्ही जास्त महत्वाची मानतो. पंकजा आणि विनोदजींचही होईल या वर्षभरात. खूप स्कोप आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

भाजप नेते विनोद तावडे आणि मी एकत्र काम केलंय. जेव्हा त्यांना तिकीट नाकारलं तेव्हा वेगळ्या चर्चा झाल्या. मात्र जे संयम ठेवतात रिअॅक्ट होत नाहीत त्यांना चांगली संधी मिळते. पंकजा चांगल काम करतायेत. त्या प्रदेश कार्यकारीणीला उपस्थित होत्या. महाराष्ट्रातही त्यांचं लक्ष आहे. वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटंल आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे परत आणू; भाजप खासदाराच्या विधानाने खळबळ”

विश्वास नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त करा; किरीट सोमय्या यांची आक्रमक मागणी

“शिवसेना-राष्ट्रवादीकडून राणे समर्थकांचा करेक्ट कार्यक्रम; रत्नागिरी जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचं वर्चस्व”