Home महाराष्ट्र पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत- पंकजा मुंडे

पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत- पंकजा मुंडे

बुलडाणा : एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असं स्पष्ट वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. त्या बुलढाण्यात बोलत होत्या.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेच्या ‘या’ नगराध्यक्षांसह कुटुंबियांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत असं म्हणत पंकजा मुंडेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

दरम्यान, माझं विश्व, माझे माता-पिता, माझं सर्वस्व जनता आहे. तुम्हाला दहा परिक्रमा करेल अजून कुठल्या प्ररिक्रमाची मला आवश्यकता नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाला त्याच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असं रोखठोक भाष्य पंकजा मुंडेंनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेच्या ‘या’ नगराध्यक्षांसह कुटुंबियांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राजकीय पोळी भाजा, पण…; एसटी संपावरुन अनिल परब यांचा पडळकर आणि खोतांना इशारा

आगामी हातकणंगले लोकसभा निवडणूकीसाठी ‘या’ नेत्याला मिळणार भाजपकडून उमेदवारी?