मुंबई : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
या पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभुमीवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे निदर्शनास आणून दिले आहेत. या पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी रेशन धान्य, मुंबईतील आरोग्य व्यवस्था आणि तबलिगी मरकजमधून परतलेल्या नागरिकांचा मुद्दा उपस्थित केला आहे.
आपण घेत असलेल्या सर्व निर्णयांना भाजप म्हणून आमचा पाठिंबा आणि सहकार्य आहेत. पण या महत्त्वाच्या बाबतीच हस्तक्षेप करुन जनहिताच्या दृष्टीने आपण त्वरेने निर्णय घ्याल अशी आशा बाळगतो, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. तसचं उद्धव ठाकरे यांना तुम्ही स्वत: लक्ष घालावं, अशी विनंतीही केली आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांचे मा. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र pic.twitter.com/BbcJvyPDvM
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 7, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“मूर्खांन सोबत सरकार चालवता चालवता अजित पवारांना लोकं पण मूर्ख वाटायला लागली की काय?”
पुढील वर्ष भराचा माझा पगार अन् CM फंडात जमा करा- जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्र उध्दवजींच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो- जितेंद्र आव्हाड
सांगलीत घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा दणका; केल्या तब्बल 350 वाहने जप्त