आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. आता सोमय्या यांचं नेक्स्ट टार्गेट शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे असल्याचं स्पष्ट झालंय.
हे ही वाचा : भाजप ए.स.टी. कामगारांची डोकी भडकवत आहे; शिवसेनेचा आरोप
सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे आणि त्याची तक्रार ईडी आणि आयकर विभागाकडे केली असल्याची माहिती सोमय्या यांनी यावेळी दिली.
दरम्यान, 23 जणांची चौकशी सुरु आहे. त्यात अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळीही आहेत. आज मी अर्जुन खोतकर यांचं नाव घेत आहे. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला. त्याची तक्रार आयकर विभाग आणि ईडीकडे तक्रार केलीय. अर्जुन खोतकर यांनी रामनगर कारखाना बेनामी पद्धतीने फसवून घेतला आहे., असा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“…म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेला पाठिंबा”
उद्धव ठाकरे स्थिर सरकार देण्यात यशस्वी; शरद पवारांचा दावा
सर्वसामान्य जनतेची ताकद आज देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला